पोलीस अधिकार्‍याचे डान्सबारमध्ये ठुमके कॅमेर्‍यात कैद

May 15, 2015 7:59 PM0 commentsViews:

15 मे : राज्यात डान्सबार बंदी असताना सुद्धा पोलीस अधिकारीच बारबालांसह ठुमके लावताना शर्मेची बाब समोर आलीये. मुंबईतील घोडबंदर इथं सी हॉक बारमध्ये पैसे उडवताना आणखी एक पोलिसवाला कॅमेर्‍यात कैद झालाय. उमेश पाटील असं महाभागावं नावं असून तो मीरा मीराभाईंदर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. पण त्यांचा हा रंगिला व्हिडिओ व्हॉट्पअपवर व्हायरल होताच पोलीस आयुक्तांनी त्याला निलंबित केलंय. घोडबंदरमधल्या सी हॉक बियर बार मधला हा व्हिडिओ आहे.

आयबीएन लोकमतचे सवाल

डान्सबार बंदी अंमलबजावणी करणारे पोलीसच कसे नाचू शकतात ?
पोलिसांच्या अशा रंगेलबाजीवर वचक का नाही ?
एपीआयच डान्सबारमध्ये नाचू लागला तर इतरांनी काय करावं ?
पोलीस आयुक्तांचा रंगेल अधिकार्‍यांवर वचक आहे की नाही?
निलंबन ही कारवाई पुरेशी आहे का ?
वर्दीवाल्यांमध्ये कुठून येतो हा उन्माद ?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close