नागपुरात गुंडाची हत्या करून मृतदेह जाळला

May 15, 2015 9:23 PM0 commentsViews:

kolhapur crime15 मे : नागपूरनगरी पुन्हा एकदा गुंडाच्या खुनाने हादरलीये. पूर्व वैमन्यसातून एका कुख्यात गुंडाची हत्या करुन त्याचा मृतदेह जाळण्याची धक्कादायक घटना घडलीये. शालिक उर्फ गुलाबसिंह जाधव या गुंडाला ठार मारण्यात आलंय. शहरापासून काही अंतरावर असलेल्या उमरेड जवळच्या जुनोनी गावात ही घटना घडलाय. विशेष म्हणजे शालिक उर्फ गुलाबसिंह जाधव हा गुंड नुकताच सहा वषांर्ची शिक्षा भोगून आला होता. या प्रकरणी रणजित राठोडसह त्याच्या आठ सहकार्‍यांना अटक करण्यात आलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close