मनपाने दिली मराठीपाट्यांसाठी 2 महिन्यांची मुदत

October 30, 2009 1:02 PM0 commentsViews: 8

30 ऑक्टोबर मुंबईमधल्या सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठीत असणं बंधनकारक असणार आहे. मुंबई महानगरपालिकेने ही सक्ती केली आहे. तसंच दोन महिन्यांच्या आत या नियमाचं पालन केलं नाही, तर 5 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात, यासाठी मोठं आंदोलन छेडलं होतं. राज ठाकरेंच्या या आंदोलनानंतर मुंबई महानगरपालिकेनेही काही दिवसांची मुदत देत पाट्या मराठीत करण्याची सूचना मुंबईतल्या दुकानदारांना आणि व्यावसायिकांना केली होती.

close