सनी लिओनविरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल

May 15, 2015 10:43 PM0 commentsViews:

sunny leone15 मे : पॉर्नस्टार आणि बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनच्या विरोधात डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अश्लिलताविरोधी मोहिमे अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हिंदू जनजागरण समितीच्या रणरागिणी शाखेच्या अंजली पालन यांनी हा गुन्हा दाखल केलाय. सनी लिओनने आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून अश्लिलतेचा प्रसार केल्याचा अंजली पालन यांचा आरोप आहे. त्यामुळेच त्यांनी हा गुन्हा दाखल केलाय.सनीच्या विरोधात कलम 292,292 ए, 294 आणि आयटी कायद्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close