मोदींचा ‘मेक इन इंडिया’चा नारा, भारत-चीनमध्ये 2200 कोटी डॉलर्सचा करार

May 16, 2015 1:16 PM0 commentsViews:

modi in china ceo16 मे : पंतप्रधान मोदींच्या चीन दौर्‍याचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. शांघायमध्ये आज (शनिवारी) इंडिया चायना बिझनेस फोरमचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये भारतीय आणि चिनी कंपन्यांमध्ये 2200 कोटी डॉलर्सचे 21 करार झाले. तसंच कच्छमध्ये 200 कोटी डॉलर्सचा उर्जा प्रकल्प उभारणार आहे.

या फोरममध्ये मोदींनी बलाढ्य चिनी कंपन्यांच्या सीईओजना संबोधित केलं. आपल्या भाषणात मोदींनी या सीईओजना मेक इन इंडियाचा नारा दिला. भारतात गुंतवणुकीसाठी वातावरण पुरक आहे. आम्ही अनेक पायाभूत सुविधा उभारतोय.तुम्हाला भारतात व्यापार करण्यासाठी आम्ही शक्य तेवढी मदत करू, असं म्हणत मोदींनी चिनी कंपन्यांना भारतात यायचं आमंत्रण दिलं. भारत आणि चीनचा विकास हे आशिया खंडाच्या विकासाठी आणि राजकीय स्थैर्यासाठी आवश्यक आहे, असं मोदी म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close