अरुणा शानबाग यांची प्रकृती स्थिर

May 16, 2015 1:04 PM0 commentsViews:

aruna shanbaug316 मे : केईएम हॉस्पिटलच्या नर्स अरूणा शानबाग यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना तीन दिवसांपूर्वी न्युमोनिया झाला होता, आणि तब्येत एवढी खालावली होती की, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण सुदैवानं, त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला, आणि त्या आता स्थिर आहेत, असं सूत्रांनी IBN लोकमतला सांगितलंय

. 1973 साली केईमच्या एका वॉर्डबॉयनं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांना मारहाण केली होती. तेव्हापासून त्या कोमातच आहेत. केईमच्या कर्मचार्‍यांनी त्यांना इतर कुठेही हलवण्यास सातत्यानं नकार दिला, आणि आम्हीच त्यांचा उपचार करू आणि त्यांची काळजी घेऊ, अशी भूमिका घेतली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close