मुंबईत सर्व हॉटेल महाराष्ट्रीयन पदार्थ मिळाले पाहिजे -आठवले

May 16, 2015 1:53 PM0 commentsViews:

athavale on maharashtiryan food16 मे : एकीकडे शिवसेना आणि स्वाभिमान संघटनेत वडापावरून वाद पेटलाय. आता रिपाइंनंही या मुद्दात उडी घ्यायचं ठरवलंय असं दिसतंय. मुंबईतील सर्व हॉटेलमध्ये अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ मिळाले पाहिजे अशी मागणी आता रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी केलीये. जर असं हॉटेलचालकांनी महाराष्ट्रीयन पदार्थ उपलब्ध केले नाहीतर हॉटेल बाहेर आंदोलन करू असा इशारा दिलाय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या दुकानांवर मराठी पाट्याच लावण्यात याव्यात यासाठी मोठं आंदोलन केलं होतं. त्याचप्रमाणं रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी आता मुंबईत सर्वच उपहारगृहात महाराष्ट्रीयन पदार्थ मिळावेत, यासाठी मोहीम छेडण्याचं ठरवलंय. आठवले यांनी मुंबईतील शिवसेना भवनाजवळ एका हॉटेलमध्ये जाऊन पोहे,आमरस,थालपीठवर ताव मारला.

मुंबईतील सर्व हॉटेल्समध्ये मराठी पदार्थ मिळावे असा आग्रह आठवलेंनी धरलाय. याबाबत हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकारी, हॉटेल मालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं आठवलेंनी सांगितलं.

तसंच हॉटेल मालक आणि राज्य सरकारकडून सहकार्य मिळालं नाही तर महाराष्ट्रीयन पदार्थ न मिळणार्‍या हॉटेलसमोर आंदोलन करणार असल्याचा इशाराही आठवलेंनी दिला.

विशेष म्हणजे, शिवसेनेच्या शिववड्या आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेनं स्वाभिमान वडा सुरू केलाय. शिववडापावला टक्कर देण्यासाठी नितेश राणे यांनी अलीकडे लोअर परेल भागात स्वाभिमान वडापावचं स्टॉल सुरूही केलंय. आता आठवलेंनीही यात उडी घेतली असून महाराष्ट्रीयन पदार्थाचा आग्रह धरलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close