औरंगाबादेत पुन्हा गाड्या जाळल्या, 8 गाड्या जळून खाक

May 16, 2015 3:14 PM0 commentsViews:

abad bike burn16 मे : औरंगाबादमध्ये पुन्हा गाड्या जाळण्याचं सत्र सुरू झालंय. शहरातील जयभवानी नगर परिसरात रात्री अज्ञात लोकांनी आठ दुचाकी वाहनांना आग लावलीय. सकाळी जयभवानी नगरातील नागरीकांना गाड्या जाळल्याचा प्रकार लक्षात आला.

वाळूज एमआयडीसी आणि औरंगाबाद शहरात गेल्या वर्षभरात जवळपास 200 दुचाकी आणि 25 चारचाकी गाड्या जाळण्यात आल्यात. मात्र, पोलिसांना अद्याप आरोपींना पकडण्यात अपयश आलंय. विशेष म्हणजे, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळूनही आरोपींना पकडण्यात अपयशी ठरलेत. त्यामुळं नागरीकांमध्ये संतापाची भावना आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close