21 वे शतक आशियाई देशांचे -मोदी

May 16, 2015 6:24 PM0 commentsViews:

modi Shanghai16 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या चीन दौर्‍याच्या अखेरीस चीनमधल्या भारतीयांशी संवाद साधला. शांघायमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी जवळपास पाच हजार भारतीय उपस्थित होते. भारताची प्रगती आज जग स्विकारत आहे. येणारं 21 वे शतक हे आशिया खंडाचे असणार आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

‘लोकांचा दृष्टीकोन बदलला’

यावेळी पंतप्रधानांनी 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांचा आणि मिळालेल्या विजयाचाही भाषणात उल्लेख केला. आपण आपल्या टीकाकारांना बाद केल्याचं ते भाषणात म्हणाले. मागील वर्षी 16 मे रोजी भारतीयांना निकालाची खूप उत्सुकता होती. त्यावेळी जगभरातून ‘दुख भरे दिन बीते रे भैय्या’ असा स्वर ऐकू येत होता. पूर्वी भारताविषयी परदेशातील लोकांचे मत वेगळे होते. पण, त्यांच्या मताचं परिवर्तन झालंय. भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलाय असंही मोदी म्हणाले.

‘टीकाकारांकडून धडा मिळाला’

आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीत आपण देशाला प्रगतीपथावर नेल्याचंही पंतप्रधांनांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितलं. लोकं माझा बायोडाटा पाहून या माणसाला विदेशी धोरणाबद्दल काही माहिती नाही. पण, लोकांकडून टीका होत होती ती योग्य होती. मला गुजरात आणि देशाबाहेर फारसं कुणी ओळखत नव्हतं. माझा बायोडाटा पाहुन कुणी पसंद करत नव्हतं. एका चहा विकणार्‍याचा मुलगा पंतप्रधान कसा होऊ शकतो असा त्यांचा समज होता. पण, आज वर्षभरातनंतर लोकांचे विचार बदलले आहे. आज आमच्या विजयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याबद्दल मोदींनी भारतीयांना कोटी-कोटी प्रणामही केला.

’21 वे शतक आशिया खंडाचे’

पंतप्रधान मोदींनी पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीयांना आवाहन केलं. प्रत्येक वर्षी पाच चिनी नागरिकांना भारतभ्रमणासाठी प्रेरीत करावे. जेणे करून भारताच्या पर्यटनात वाढ होईल आणि भारताबद्दल चांगल्या भावना व्यक्त होतील असं आवाहनही मोदी केलं. 21वं शतक हे आशिया खंडाचं असणार आहे. भारज आज 7 टक्क्यांहुन अधिक प्रगती करत आहे. संपूर्ण जग हे भारताच्या प्रगतीचा स्विकार करत आहे. गेल्या 30 वर्षांत चीनने ज्याप्रमाणे प्रगती केली त्याचप्रमाणे भारताने गती पकडलीये असे गौरद्गारही काढले.दरम्यान, नरेंद्र मोदींनी चीनचा दौरा आटोपून मंगोलियाच्या दौर्‍यासाठी रवाना झालेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++