काँग्रेस राष्ट्रवादीची खातेवाटपावरुन ताठर भूमिका

October 31, 2009 9:02 AM0 commentsViews: 6

31 ऑक्टोबर काँग्रेस राष्ट्रवादीत खातेवाटपाचा घोळ अजूनही कायम आहे. आठ दिवस उलटून गेले तरी अजून सरकार स्थापन करण्याबद्दल निर्णय झालेला नाही. खातेवाटप आणि मंत्रीपदावरून चर्चेचं गुर्‍हाळ सुरूच आहे. दोन्ही पक्षांनी शुक्रवारी आपल्या नेत्यांच्या स्वतंत्र बैठकी गेऊन चर्चा केली. पण आघाडीत या घोळामुळे शपथविधी लांबणीवर पडला आहे. येत्या दोन दिवसात चर्चा करुन सोमवारी शपथविधी होईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान मंत्रिमंडळामध्ये भ्रष्टाचारी आमदारांना घेतलं तर राज्यभर आंदोलन छेडू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. नवाब मलिक, डॉ.विजयकुमार गावित यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

close