भाजपसाठी ‘झिजणार्‍या’ पदाधिकार्‍यांना कोल्हापुरी चप्पल भेट

May 16, 2015 8:57 PM0 commentsViews:

kolhapur_bjp16 मे : भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन 23 आणि 24 मार्चला कोल्हापुरात होणार आहे. या अधिवेशनाच्या निमंत्रणादरम्यान पदाधिकार्‍यांच्या चप्पलची साईज विचारल्यानं पदाधिकारी अवाक झाले. मात्र, कोल्हापुरात अधिवेशन असल्यानं येणार्‍या पदाधिकार्‍यांना कोल्हापुरी चप्पल भेट म्हणून देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी राज्यभरातून तब्बल 900 पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर या अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी आहे. दरम्यान, काँग्रेसने या चपला भेट देण्याच्या भाजपच्या कल्पनेवर खोचक टीका केलीये. शेतकर्‍यांच्या चपला सरकार दरबारी खेटे घालून झिजल्या तरी त्याला मदत मिळाली नाही. मात्र, भाजपला पदाधिकार्‍यांच्या चपलांची काळजी असल्याच नांदेड काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close