अण्णा हजारेंच्या स्कॉर्पिओची 9 लाख 11 हजारांत विक्री

May 17, 2015 12:42 PM0 commentsViews:

ANNA HAZARE SCORPIO

17 मे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या स्कॉर्पिओ गाडीची 9 लाख 11 हजार रुपयांना विक्री झाली आहे. अहमदनगरच्या प्रवीण लोखंडे यांनी ही गाडी विकत घेतली. या स्कॉर्पिओच्या विक्रीनंतर अण्णांसाठी इनोव्हा गाडी घेण्यात येणार आहे.

अण्णांच्या स्कॉर्पिओ गाडीसाठी 16 जणांनी बोली लावली होती. पण श्रीगोंदा तालुक्यातील देवदेठनचे ग्रामपंचायत सदस्य असलेले प्रवीण लक्ष्मण लोखंडे यांनी ही स्कॉर्पिओ खरेदी केली. लिलावाचे पैसे विवेकानंद कृतज्ञता निधीत जमा होणार आहेत.

अण्णा यांच्या या गाडीने आत्तापर्यंत पावणे दोन लाख किमीचा प्रवास केला असून, महाराष्ट्राचा दौरा करत असताना नागपूरमध्ये याच गाडीवर हल्ला झाला होता. जनलोकपालच्या आंदोलनावेळी याच स्कॉर्पियोने अण्णा सर्वत्र फिरत होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close