बिहारमध्ये सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता

May 17, 2015 3:14 PM0 commentsViews:

jitan_nitesh_lalu17 मे : बिहारमध्ये येत्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयोगाने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. त्यामुळे बिहारमध्ये आता निवडणुकीचे वारे वाहू लागले असून भाजपाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची समजली जात आहे.

बिहारमध्ये चालू वर्षात विधानसभा निवडणूक होणार असून निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. रविवारी मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी बिहारमधील निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोंबरमध्ये होतील अशी शक्यता वर्तवली आहे. 31 जुलैपर्यंत बिहारमधील मतदारांची अंतिम यादी तयारी केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

बिहारमधल्या निवडणूकांमध्ये पैसा आणि बळाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. याला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. यंदा निवडणुकी आधी एका स्वतंत्र यंत्रणेमार्फत माहिती गोळा करण्यासोबत अशा प्रकारांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. शिवाय निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात येणार आहे.

यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ज्या सर्व जनता दलाच्या नेत्यांनी एकत्रित येवून एकच पक्ष स्थापण्या बाबतचा विचार केला होता तो आता सध्यस्थितीत पूर्णपणे बारगळलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण कोणाशी आघाडी करत आणि मतदार कुणाला साथ देतात याचीच उत्सुकता सर्वांना असणार आहे. दिल्लीतील पराभवानंतर भाजपासाठी बिहारची निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. ही निवडणूक भाजपासाठी परीक्षा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close