शालिनीताई पाटील पुन्हा जाणार काँग्रेसमध्ये

October 31, 2009 12:54 PM0 commentsViews: 75

31 ऑक्टोबर कोपरगावच्या माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून पक्षाशी मतभेद झाल्यानं त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर शालिनीताई पाटील सातत्यानं राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टीका करत होत्या. सातारा जिल्ह्यातल्या कोपरगाव मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाल्याने त्यांनी आता काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीला उतरती कळा लागली आहे. राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलिन होण्याशिवाय पर्याय नाही, असा टोलाही शालिनीताईंनी यावेळी लगावला.

close