अमिताब बच्चन यांना धमकीचा एसएमएस

October 31, 2009 12:56 PM0 commentsViews: 112

31 ऑक्टोबर आपल्याला एका अज्ञात व्यक्तीने एसएमएस पाठवून धमकी दिल्याचं बिग बी अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये म्हटलंय. या एसएमएसमध्ये अमिताभ बच्चन मंदिराबरोबरच दर्ग्यातही जातात, या गोष्टीवर टीका केली आहे. त्याचबरोबर बच्चन यांनी परत तसं करु नये असंही त्यात म्हटलंय. पण या एसएमएसला बिग बींनी आपल्या ब्लॉगवर प्रतिउत्तर दिलं आहे. ते म्हणतात की मी या गोष्टीची पुनरावृत्ती करतच राहीन. जर हिंमत असेल तर मला येऊन रोखावं असं आव्हान त्यांनी केलंय.

close