मनोहर पर्रिकरांनीही घेतली सरसंघचालकांची भेट

May 17, 2015 8:34 PM0 commentsViews:

ËêÖêËêÖêËparikar17 मे :  केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापाठोपाठ आता केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरही यांनीही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. पर्रिकर यांनी भागवत यांच्याशी एक तास प्रदीर्घ चर्चा केली. नागपुरात गेल्या चार दिवसांत भाजपचे केंद्रीय मंत्री आणि प्रक्ष प्रमुखांच्या संघ मुख्यालयात फेर्‍या वाढल्याने कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आज दुपारी नागपुरात दाखल झाले. आज त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात सरसंघचालकांची भेट घेतली. मोहन भागवतांच्या भेटीनंतर मनोहर पर्रिकर यांनी नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांचीही भेट घेतली.

मोदींचा चीन दौरा आणि भाजप नेत्यांचा नागपुरात संघ मुख्यालयाचा दौर्‍यांमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. संघाने या भेटींमध्ये आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नसल्याचे सांगितलं असलं तरी नक्कीच यामागे काही महत्त्वाचे निर्णय आगामी काळात होण्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, पर्रिकर यांनीसुद्धा आपल्याला सरसंघलाचकांशी भेटण्यासासाठी कोणत्याही कारणांची गरज नसल्याचं सांगितलं. तसंच संरक्षण खात्याची नागपुरात बैठक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. चीन संदर्भातले प्रश्न एक-दोन दिवसात सुटणार नाहीत. पण प्रश्न सुटण्याची प्रक्रीया मोदींच्या दौर्‍यानं सुरू झालीये, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच भारताजवळ पुरेशी युद्धसामुग्री उपलब्ध आहेत, याविषयी आलेले अहवाल जुने आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close