औरंगाबाद जळीतकांडप्रकरणी तिघांना अटक

May 18, 2015 12:45 PM0 commentsViews:

bike fire

18 मे :  औरंगाबादमध्ये घडलेल्या बाईक जळीतकांडाप्रकरणी तीन आरोपींना 24 तासात अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. जयभवानीनगरमध्ये 15 तारखेच्या मध्यरात्री 10 बाईक जाळण्यात आल्या होत्या.

अटक करण्यात आलेले तिघेही आरोपी हे अट्टल गुन्हेगार असल्याचं समजते. मुकुंदवाडी परिसरातून पोलिसांनी तिन्ही गुन्हेगारांना जेरबंद केलं आहे. नशेत असताना तिघांनी गाड्या जाळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

परिसरातल्या गाड्या एकत्र करून एकाच ठिकाणी जाळण्यात आल्या होत्या. या घटनेमुळे औरंगाबादेत एकच खळबळ माजली होती.  औरंगाबाद पोलिसांवरही खूप टीका झाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहिम राबवून आरोपींना अटक केली. पोलिसांच्या या कामगिरी बद्दल पोलीस आयुक्तांनी तब्बल 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close