पंतप्रधान मोदी दक्षिण कोरियामध्ये दाखल

May 18, 2015 3:49 PM0 commentsViews:

modi-souel_0_0

 18 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन देशांच्या अखेरच्या टप्प्याला सुरुवात झाली असून, पंतप्रधान मोदी आज (सोमवारी) दक्षिण कोरियामध्ये दाखल झाले आहेत.

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये दाखल होताच पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. भारतीय समुदायाच्या नागरिकांनी मोदींचं स्वागत केलं. मोदी आज दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्युन हाय यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाली. या दौर्‍यादरम्यान अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. पंतप्रधान उद्या भारतात परतणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close