आझमींच्या मागणीवर मनसेचा हल्लाबोल

October 31, 2009 1:50 PM0 commentsViews: 4

31 ऑक्टोबर आझमी यांनी विधीमंडळाच्या कामकाजाची प्रत मराठीऐवजी हिंदीत मिळावी अशी मागणी केली आहे. यांच्या या विधानावर मनसेने हल्लाबोल केला आहे. आझमींना मराठी येत नसेल तर त्यांनी उत्तर प्रदेशात चालत व्हावं अशी प्रतिक्रीया मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. त्यांनंतर शिवसेना आणि भाजपनेही आझमींच्या या मागणीवर तीव्र टीका केली आहे. एकीकडे आझमी यांच्यावर सर्वपक्षीय टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आझमी यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या मागणीमुळे पुन्हा एकदा मराठी-अमराठीच्या नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नेहमीच उलटसुलट विधानं करून चर्चेत राहाणारे अबु आझमी पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

close