मनसेच्या गटनेतेपदी बाळा नांदगावकर

November 2, 2009 8:41 AM0 commentsViews: 14

2 नोव्हेंबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटनेतेपदाची बाळा नांदगावकर तर वसंत गिते यांची विधीमंडळाच्या उपनेतेपदी निवड करण्यता आली आहे. त्याचबरोबर पक्ष प्रतोदपदी नितीन सरदेसाई असतील. वांद्र्यातल्या एमआयजी क्लबमध्ये राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदे मध्ये या निवडींची घोषणा केली. मंगळवारपासून विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे, या अधिवेशनात मनसेच्या आमदारांनी कशी भूमिका मांडावी, मनसेचा काय अजेंडा असेल या मुद्दयांवरसुध्दा या बैठकीत चर्चा झाली. मनसेचा प्रत्येक आमदार मराठीतूनच शपथ घेईल असं हि राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

close