‘तेजस’चं ‘टेकऑफ’, वर्षभरात 4 ते 5 विमानं तयार होणार !

May 19, 2015 10:15 AM0 commentsViews:

Tejas plane19 मे : तेजस या लढाऊ विमानाच्या उत्पादनाची तयारी सुरू असून या वर्षी 4 ते 5 तेजस विमान येतील आणि पुढच्या वर्षी 8 ते 10 तेजस विमाने येतील आणि गरज पडल्यास आणखी उत्पादन वाढवू असं केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी भंडारा येथील आर्डनर्स फॅक्टरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. आतापर्यंत 600 करोडचं उत्पादन होत होतं ते पुढच्या वर्षी 850 करोडपर्यंत जाणार असल्याचं पर्रिकर यांनी सांगितलं.

भंडारा जिल्यातील जवाहरनगर येथील आर्डनर्स फॅक्टरीत पाहणी केल्यानंतर पर्रिकर पुढे म्हणाले की, संरक्षणाच्या संदर्भात अनेक प्रकल्प पूर्ण झाले असून अनेक प्रकल्प मार्गी लागण्याच्या प्रयत्नात आहेत. आर्डनर्स फॅक्टरीच्या उत्पादनामध्ये वाढ होत आहे. हाही मेक इन इंडियाचा एक भाग आहे असे ते म्हणाले. कॅगचा रिपोर्ट हा 20 वर्षांपूर्वीचा रिपोर्ट असल्याचे त्यांनी यावेळी सागितलं. यावेळी भंडारा जिल्यातील काही सामाजिक संघटनांनी मनोहर पर्रिकर यांना भंडारा आर्डनर्स कंपनीतर्फे काही वर्षां आधी टाकण्यात आलेल्या बंद असलेल्या रेल्वे मार्गावरून भंडारा रोड ते भंडारा शटल ट्रेन सुरू करण्यात यावी अश्या मागण्यांचे निवेदन दिलं. रेल्वे विभागाशी मी बोलतो ते जर तो रस्ता रेल्वे विभाग आपल्याकडे हस्तातरण करून रेल्वे सुरू करत असेल तर आम्हीही सहकार्य करू असं आश्वासन पर्रिकर यांनी दिलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close