अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची ट्विटरवर एंट्री

May 19, 2015 10:50 AM0 commentsViews:

obama twitter19 मे : लाखो सेलिब्रिटी, लेखक, खेळाडू आणि दिग्गजांची मांदियाळी असलेल्या ट्विटरचा मोह आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनाही आवारला नाही. ओबामांनी आता ट्विटरवर स्वत : हँडल सुरू केलंय.

‘हॅलो ट्विटर, मी बराक ओबामा !’ असं ट्विट करून ओबामांनी ट्विटरवर धडाकेबाज एंट्री केलीये. ओबामांचं ऑफिशियल ट्विटर अकाऊंटही आहे त्यावर इतके दिवस ते फक्त राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्विट करायचे.. तेही त्यांच्या टीमची माणसंच त्यांच्या वतीनं ट्विट करायची.. पण आता खुद्द ओबामा ट्विट करतायत.

स्वतःचं वर्णनही त्यांनी मस्त केलंय. वडील, पती आणि अमेरिकेचा 44वा अध्यक्ष, असं त्यांनी स्वतःबद्दल लिहिलंय. काही तासांमध्ये लाखो लोक ओबामांना फॉलो करायला लागले. ऍट पोट्स असं त्यांचं ट्विटर हँडल आहे. पोट्स म्हणजे President of the United States.. हा शॉर्ट फॉर्म अमेरिकेत प्रसिद्ध आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

 
Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close