‘त्या’ फोटोतल्या महिलेला ILCI कडून ‘आजीचा बटवा’ योजनेअंतर्गत औषधं !

May 19, 2015 4:30 PM0 commentsViews:

pune news19 मे : पुण्यात ILCI म्हणजेच इंटरनॅशनल लाँजिटिव्हिटी सेंटर इंडिया या संस्थेनं एका वृद्ध महिलेच्या फोटोचा दुरुपयोग करून डोनेशन गोळा केल्याचा आरोप वृद्ध महिलेच्या कुटुंबीयांनी केला होता. पण, त्या महिलेला ही संस्था ‘आजीचा बटवा’ या योजनेअंतर्गत औषधं पुरवली जातात, असं या संस्थेतर्फे सांगण्यात आलंय.

पुण्यातील अभिरुची मॉल इथल्या पु ना गाडगीळ ज्वेलर्समध्ये ILCI या संस्थेने एक दानपेठी ठेवली होती. या दानपेटीवर राधाबाई सातपुते या जेष्ठ महिलेचं छायाचित्र लावण्यात आलं होतं. राधाबाई सातपुते यांचा साभाळ करणारं कुणी नाही. त्यांच्या प्रकृतीच्या देखभाली करिता आर्थिक मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण, राधाबाई यांच्या नातेवाईकांनी यावर आक्षेप घेतला होता आणि संस्थेच्या विरोधात सिहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केला होता. पण, डोनेशन बॉक्सवर प्रातिनिधिक फोटो असतो आणि जी देगणी मिळते त्यातून वृद्धांसाठी औषधोपचार केले जातात. या योजनेत फोटो असलेल्या राधाबाई सातपुते यांनाही औषधी दिली जातात, असं या संस्थेच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अंजली राजे यांनी सांगितलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close