प्राणीसंग्रहालयात हलवलं म्हणून वाघोबा बसले उपोषणाला !

May 19, 2015 12:06 PM0 commentsViews:

TIGER_18515 19 मे : तुम्हाला तुमच्याच घरातून दुसरीकडे हलवलं तर साहजिकच तुम्हाला राग येणार..तुम्ही विरोध करणार, आंदोलन करणार हे झालं नाहीतर कोर्टात, पोलिसांत जाणार पण आपण तर झालो माणसं…पण असंच जर एका मुक्याप्राण्यासोबत घडलं तर त्याने कुठे जायचंय ?, आणि तोही जंगलाचा राजा वाघ असल्यावर…रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातून या वाघोबांना प्राणीसंग्रहालयात हलवण्यात आल्यामुळे वाघोबा चक्क उपोषणाला बसले आहे.

त्याचं झालं असं की, रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात T-24 उर्फ उस्ताद या नावाने ओळखल्या जाणार्‍या या वाघावर 44 वर्षांच्या वनरक्षकाला ठार केल्याचा आरोप आहे. वाघ नरभक्षक झाला म्हणून त्याची रवानगी सज्जनगडच्या प्राणीसंग्रहालयात करण्यात आली. पण तेव्हापासून या वाघाने त्याला देण्यात येणारं मृत प्राण्याचं मांस खाल्लं नाही. गेल्या 8 वर्षांत उस्तादने इतर 3 लोकांवरही हल्ले केले होते. वन विभागाने दावा केलाय की, 8 मे रोजी उस्तादने वनरक्षकावर हल्ला करून ठार मारलं. त्यानंतर 12 मे रोजी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी पाहणी केली तेव्हा उस्तादला तिथून काही अंतरावर पाहण्यात आलं. त्यामुळे, उस्तादनेच हा हल्ला केला असा निष्कर्ष काढून त्याला प्राणी संग्रहालयात हलवण्यात आलं.
पण, राजस्थानचे वनमंत्री राजकुमार रिणवा यांनी उस्ताद नरक्षक नाही असा दावा केलाय. व्याघ्र प्रकल्पात असलेल्या मंदिरात भाविकांवर कधीच उस्तादने हल्ला केला नाही. जर कुणी त्याच्या परिसरात प्रवेश केला तरच तो हल्ला करू शकतो असंही रिणवा यांनी स्पष्ट केलं.

मात्र, वन विभागाने उस्दादला रणथंबोरपासून 530 किलोमीटर दूर सज्जनगडच्या प्राणींग्रहालयात हलवलंय. या निर्णयाची चौकशी करण्यासाठी आता एका समितीची स्थापना करण्यात येतेय. एवढंच नाहीतर हा वाद आता हायकोर्टात पोहचलाय. वन्यप्रेमींनी यासंबंधी हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केलीय. तर या वाघाने मनुष्यवस्तीत जाऊन हल्ला केलेला नसल्याने हा निर्णय योग्य नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close