मुंबईत पेट्रोल टँकरचा स्फोट, २ ठार

May 19, 2015 1:40 PM0 commentsViews:

Mumbai blast

19 मे : मुंबईत चेंबूरमध्ये पेट्रोलच्या टँकरचा स्फोट होऊन दोन जण जागीच ठार झाले. या अपघातात एक जण जखमीही झाला. पेट्रोलच्या टँकरवर वेल्डिंगचं काम सुरू होतं.

आत पेट्रोल नसलं, तरी पेट्रोलच्या वाफा होत्या. त्याचा स्फोट झाला आणि ट्रकचे अक्षरशः दोन तुकडे झाले. हा प्रकार चेंबूर-माहूलच्या गडकरी खाण परिसरात झाला.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रकार ज्या गॅरेजसमोर झाला, तिथेच हिंदुस्तान पेट्रोलियमचा मोठा प्लँट आहे. या प्लँटमध्ये हजारो लिटर पेट्रोल साठवण्याची क्षमता आहे. पण सुदैवाने या प्लँटची कोणतीही हानी झाली नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close