अंगरक्षकाने छेड काढली ‘ती’ने नेत्याची मर्सिडीज फोडली

May 19, 2015 1:00 PM0 commentsViews:

agrawomen 19 मे : छेड काढणार्‍या अंगरक्षकाला एका महिलेनं चांगलाच धडा शिकवला. समाजवादी पार्टीचे नेते अभिनव शर्मा यांच्या अंगरक्षकाने एका महिलेची छेड काढली. संतप्त झालेल्या महिलेच्या बहिणीने नेत्यांच्या मर्सिडीजवर हल्लाबोल केला. आणि मर्सिडीजची काच फोडून आपला राग व्यक्त केला.

झालं असं की, आग्रा इथं समाजवादी पार्टीचे स्वयंघोषित नेते अभिनव शर्मा आले असता पीडित महिलेची बहिणी मोबाईलने फोटो काढत होती. पण, शर्मा यांच्या अंगरक्षकाने मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि फोडून टाकला. अंगरक्षकाने आपल्या बहिणीची छेड काढली असा आरोप या महिलेनं करत थेट नेत्याच्या मर्सिडीजवर हल्ला चढवला. मर्सिडीजवर चढून या महिलेनं आरडाओरड केली आणि गाडीची काच फोडली.

या दरम्यान, हा अंगरक्षक गर्दीत लपला. या महिलेनं त्याला समोर येण्याचं आव्हान दिलं. थोड्यावेळाने पोलिसांनी येऊन महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर शर्मा यांनी त्या अंगरक्षकाला कामावरून काढून टाकलंय, असं स्पष्टीकरण दिलं. त्या महिलेनं मोबाईलचा खर्च म्हणून 6500 रुपयेही वसूल केले तेव्हाचा नेत्याची मर्सिड़ीज सोडली. दरम्यान, अभिनव शर्मा हे सपामध्ये नाहीय, असं पक्षानं स्पष्ट करून प्रकरणातून अंग बाहेर काढलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close