पुण्यात मनसे नगरसेविका रुपाली पाटील यांच्यावर हाणामारीचा आरोप

May 19, 2015 2:49 PM0 commentsViews:

19 मे : पुण्यात तुळशीबाग मंडईतल्या जागेवरून सध्या मोठा वाद पेटलाय. या जागेवरून रविवारी मनसे नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील आणि जागडे या दोन गटांमध्ये हाणामारीही झाली होती. यात सहा जण जखमी झालेत. ही हाणामारी सीसीटीव्हीमध्ये कैद झालीये. या प्रकरणी मनसे नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे आणि त्यांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

घडलेली हकीकत अशी की, तुळशीबाग मंडईतच उसाच्या रसाचं गुर्‍हाळ आहे. या गुर्‍हाळावर पुणे महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मात्र, त्याच भागातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्यात येत नाही आणि या भागात व्यवसाय करणार्‍या लोकांना त्याचा त्रास होतो असं जागडे कुटुंबियाच म्हणणं आहेे आणि त्यातून हा वाद निर्माण झाला. यातून निर्माण झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला. नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांना पुणे कोर्टाने 29 मेपर्यंत जामीन मंजूर केलाय. राजकीय हेतूने आपल्यावर आरोप करण्यात येत असल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close