20 रुपयांहून कमी दर दिल्यास कारवाई – एकनाथ खडसे

May 19, 2015 8:00 PM0 commentsViews:

erahrjabjr

19 मे : राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांमागे किमान 20 रूपये प्रति लिटर दर देण्यात यावा, त्यापेक्षा कमी दराने दूध खरेदी करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिला. दूध दरासाठी लवकरच नवीन कायदा करण्यात येणार आहे. पण, तुर्तास यासंदर्भात अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती खडसे यांनी दिली.

दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी, वितरक आणि संस्थांच्या पदाधिकार्‍यांची मुंबईत आज बैठक पार पडली. या बैठकीत वितरकांनी दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी लिटरमागे 20 रूपयांचा भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध दरासाठी लवकरच नवीन कायदासुद्धा करण्यात येणार आहे. पण नवी कायदा येईपर्यंत याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस परदेश दौऱयावरून परतल्यानंतर नव्या कायद्याचा निर्णय घेण्यात येईल, असं खडसे यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close