मुंबईत दूध विक्रेत्यांचा गोकुळ, मदर डेअरी आणि अमूल दूधावर बहिष्कार

May 20, 2015 10:46 AM0 commentsViews:

mumbai milk4420 मे : मुंबई, ठाणे आणि कल्याण, डोंबिवली या भागात गोकुळ, मदर डेअरी,अमूल दूधावर दूध विक्रेत्यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आजपासून या ब्रँड्सचं दूध मुंबई परिसरात मिळणार नाहीये. अनेक दुधाचे स्टॉल्स आज मुंबईत बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांचे हाल झाले. या दूध उत्पादकांनी आम्हाला 10 टक्के कमिशन द्यावं, अशी दूध विक्रेत्यांची मागणी आहे. तोपर्यंत आम्ही गोकुळ, मदर डेअरी, अमुलचं दूध विकणार नाही, अशी भूमिका घेतलीय. दरम्यान, वारणा आणि महानंद यांनी मात्र दूध विक्रेत्यांशी वाटाघाटी केल्यात. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांचं दूध मिळणार आहे.

दरम्यान, राज्यातल्या दुध उत्पादक शेतकर्‍यांकडून वितरकांनी किमान 20 रूपये प्रति लिटर दरानं दूध विकत घ्यावं, नाहीतर त्यंाच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशा इशारा दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी दिला. दूध उत्पादक शेतकरी, वितरक आणि संस्थांच्या पदाधिकार्‍यांची बैठक विधान परिषदेचे सभापती राम राजे निंबाळकर यांच्या दालनात झाली. त्या बैठकीत वितरकांनी शेतकर्‍यांना दुधासाठी 20 रूपये दर द्यावा असा तोडगा काढण्यात आला. मात्र, शेतकरी 20 रुपयांच्या भावावर मात्र नाराज आहे .

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close