पंतप्रधान मोदी भारतात परतले, ट्विटरवर टीकेचा मारा सुरूच

May 20, 2015 10:55 AM0 commentsViews:

modi in india420 मे : चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरीयाच्या दौर्‍यावरून पंतप्रधान मोदी भारतात परतलेत. पण त्यांनी शांघायमध्ये केलेल्या टिप्पणीवरून चौफेर टीका होतेय. सोशल मीडियावरही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटलीय मोदी इन्सल्ट्स इंडिया हा हॅशटॅग काल पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होता.

देशाची एवढी दुर्दशा झाली होती की, आपला भारतात जन्म झाला याची लाज, भारतीयांना वाटत होती असं मोदींनी म्हटलं होतं. शांघायमध्ये भारतीय समुदायासमोर ते बोलत होते. मोदींची भाषणं चांगली असली तरी त्यांनी विदेशात असं बोलणं टाळलं पाहिजे असं नेटीझन्सचं म्हणणं आहे.

तर काँग्रेसनंही पंतप्रधानांच्या भाषणावर जोरदार आक्षेप घेतलाय. मोदी सातत्यानं आघाडी सरकारच्या कारभारावर नाव न घेता टीका करत असल्यानं काँग्रेसनं जोरदार हल्लाबोल केलाय. दरम्यान, काँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी मोदींच्या परदेश प्रवासावर टीका केलीय. मोदींना निवासी भारतीयांऐवजी अनिवासी भारतीयांबद्दल मोठी चिंता असल्याचं म्हटलंय.

पंतप्रधान मोदींवर निवडक टीका

अरूण मायसोर : गुचीचा सूट, BVLGARIचा गॉगल, आणि LVची शाल वापरून ते स्वतःला देशप्रेमी म्हणवतात… कोणाला नेमकी भारताची लाज वाटतेय #ModiInsultsIndia

कोमल : पंतप्रधानांच्या पदाचा मला आदर आहे, पण स्वत:ची प्रतिमा मोठी करण्यासाठी देशाची प्रतिष्ठा पणाला लावू नये, माझा या गोष्टींना पाठिंबा नाही.

पवन खेरा : तुमच्या आकलनापेक्षा भारत खूप खूप मोठा आहे#ModiInsultsIndia

टिनू चेरियन अब्राहम : भारतात आधी काय घडलं हे अनेकांना आवडत नसेल, विदेशात नव्या संधी शोधण्यासाठी गेलं पाहिजे. भारतीय असण्याची लाज वाटण्याचं कारण नाही.

अनुभव सिन्हा – मोदीजी तुम्ही केवळ स्वतःपूरतं बोला.. केवळ स्वतः पुरतं..
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close