कोटला मैदानावर सापडली जिवंत काडतुसं

November 2, 2009 10:15 AM0 commentsViews: 8

2 नोव्हेंबर फिरोजशहा कोटला मैदानावर जिवंत काडतुसं सापडल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे सीरिजमधल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. 31 ऑक्टोबरला दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमच्या बाथरुममध्ये सात जिवंत काडतुसं सापडली होती. शनिवारी मॅचच्या आधी साडेबारा वाजता पोलिसांना ही काडतुसं सापडली. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

close