मटक्यात हरल्यामुळे तरुणाची आत्महत्या

May 20, 2015 1:17 PM0 commentsViews:

pune matka4420 मे : पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात घोडेगावमध्ये मटक्यात हरल्यामुळे एका तरुणानं आत्महत्या केलीये.अमोल बोर्‍हाडे असं या तरुणाचा नाव आहे.  पण पोलिसांनी मात्र हा प्रकार दाबल्याचं या तरुणाच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

अमोलने आपली सगळी पुंजी मटक्यात घालवली. जमीन विकून मिळालेला पैसा गमावल्यानं त्यानं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. पण पोलीस मात्र या गावात मटका सुरुच नाही असा दावा करत आहे. तर इथे गावोगाव मटक्याचे अड्डे राजरोजपणे सुरू असल्याचं याचबद्दल IBN लोकमतचे रिपोर्टर रायचंद शिंदे यांनी तिथे जाऊन घेतलेल्या आढाव्यातून स्पष्ट होतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close