‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’ मालिकेतील बा काळाच्या पडद्याआड

May 20, 2015 1:35 PM0 commentsViews:

sudha_shivpuri20 मे : ज्येष्ठ अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचं आज (बुधवारी) मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 77 वर्षांच्या होत्या. 2013 साली त्यांना स्ट्रोक आला होता. त्यातून त्या बर्‍या झाल्या होत्या. स्टार प्लस वाहिनीवर ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’ या मालिकेतली त्यांची बा ही भूमिका खूप गाजली होती.

14 जुलै 1937 साली सुधांचा राजस्थानमधल्या एका गावात जन्म झाला. त्यांनी दिल्लीत अभिनयाची सुरुवात केली. 1974 साली त्या मुंबईत स्थलांतरित झाल्या. त्यांनी अनेक गाजलेल्या हिंदी नाटकांमध्ये काम केलं. आधे अधुरे, तुगलक, आणि खामोश, अदालत जारी है, अशा नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. रजनी या मालिकेत त्यांनी प्रिया तेंडुलकर यांच्या आईची भूमिका केली होती. सुधा शिवपुरी यांची मुलगी हिमानी शिवपुरी याही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close