पुणे बीआरटीएसचा बोजवारा

May 20, 2015 3:13 PM0 commentsViews:

20 मे :  पुण्यात बीआरटीएस योजना 2006 साली प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली. आज तब्बल 9 वर्षांनीही त्यात अनेक अडथळे येतायत. स्वारगेट ते हडपसर या साडे दहा किलोमीटर बीआरटीएस मार्गाचा पुरता बोजवारा उडालाय. या मार्गावर उड्डाणपुलांचं काम सुरू आहे. त्यामुळे बीआरटी या बससाठी राखीव असलेल्या रस्त्याला काही अर्थच उरलेला नाही. दुसरं म्हणजे रस्त्याच्या या विशेष भागात इतर वाहनांना मनाई आहे. पण तसं होत नाही. बस सोडून सर्व वाहनं या लेनमध्ये सर्रास घुसतात, त्यामुळे अनेक अपघात होतायत, आणि वाहतूक कोंडीही..

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close