हरभजन सिंगचं कमबॅक, ईशांत शर्मालाही संधी

May 20, 2015 3:57 PM0 commentsViews:

bhajji44420 मे : तब्बल दोन वर्षं टीमबाहेर असलेल्या हरभजन सिंगने अखेर टीमध्ये कमबॅक केलंय. बांगलादेश दौर्‍यासाठी भारतीय टीमची घोषणा झालीये. जून महिन्यात टीम इंडियाचा बांगलादेश दौरा आयोजित आहे. यात टीम इंडिया एक टेस्ट मॅच आणि 3 वन डे खेळणार आहे.

मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत या दौर्‍यासाठीच्या टीमची घोषणा करण्यात आली. हरभजन सिंगनं या दौर्‍यासाठीच्या टेस्ट टीममध्ये स्थान पटकावलंय. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दमदार कामगिरी केल्यामुळे हरभजनला ही संधी मिळालीये. जवळपास दोन वर्षांनंतर हरभजननं भारतीय टीममध्ये पुनरागमन केलंय. पण वन डे आणि टेस्टच्या इतर टीममध्ये कोणताही बदल करण्यात आला नाहीये. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील टीम इंडिया कायम ठेवली गेलीये. टेस्ट टीमचं नेतृत्व विराट कोहलीकडे तर वन डे टीमचं नेतृत्व कॅप्टन धोणी करेल. हरभजन सिंगच्या कमबॅकमुळे टेस्ट टीममधून रवींद्र जडेजाला बाहेर बसावं लागलंय. तर वन डे टीममध्ये मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत धवल कुलकर्णीला संधी मिळालीये.

अशी आहे टेस्ट टीम

– विराट कोहली – कॅप्टन, मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान सहा
आर.अश्विन, हरभजन सिंग,कर्ण शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, वरुण ऍरॉन, ईशांत शर्मा

अशी आहे वन डे टीम

– महेंद्रसिंग धोणी- (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, शिखर धवन, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल
भुवनेश्‍वर कुमार, मोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close