राजकारणात आल्याने महिला ग्रामपंचायत सदस्याचं कुटुंब वाळीत

May 20, 2015 9:01 PM0 commentsViews:

Jat panchayat20 मे : राजकारणात आल्याने महिला ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला जात पंचायतीने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार दौड तालुक्यातील पारगावात उघडकीस आला आहे. वडार समाजाच्या जात पंचायतीने गावातील उल्हास मोरे याच्या कुटुंबाला वर्षभरापासून वाळीत टाकले आहे.

उल्हास मोरे यांची पत्नी अनिता मोरे यांची पारगाव ग्रामपंचायातीवर सदस्य म्हणून निवड झाली. पण महिलांनी राजकारणात पडू नये, असा आक्षेप घेऊन जातपंचायतीकडून त्यांना वाळीत टाकण्यात आले. ग्रामपंचायतीवर निवड झाल्यावर अनिता यांनी वडार समाजातल्या काही अनिष्ट चालीरितींना विरोधही केला. त्यामुळे जात पंचायतीची नाराजी अधिक वाढली.

मोरे कुटुंबीयांनी याविरोधात यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सामान्यांना नाहक छळणार्‍या जात पंचायतीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close