लवकर सरकार स्थापन करा – राज्यपालाची सूचना

November 3, 2009 8:17 AM0 commentsViews: 2

3 नोव्हेंबर लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याची सूचना राज्यपाल एस. सी. जमीर यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केली आहे. नव्या सरकारची वाट पाहणार्‍या जनतेला आता राज्यपालांनीच दिलासा दिला आहे. सरकार स्थापनेला उशीर होत असल्यानं राज्यपालांनीच मंगळवारी मुख्यमंत्र्यांना राजभवनावर बोलावून घेतलं. सरकार स्थापन करण्याविषयीच्या सूचना दिल्या. दुसरीकडे राज्यपालांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनाही चर्चेसाठी राजभवनावर बोलावलं आणि त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी भुजबळांनी सरकार स्थापनेसाठी पाठिंब्याचं पत्र दिलं की नाही, याचीच उत्सुकता सगळ्यांना होती. मात्र भुजबळांनी पाठिंब्याचं पत्र दिलेलं नाही. निवडणुकीचा निकाल लागून मंगळवारी 12 दिवस होत आहेत. तरीही मंत्रिमंडळातल्या खातेवाटपाचा प्रश्न मंत्र्यासाठी बिकट होऊन बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये त्यावर अजुनही तोडगा सुचलेला नाही. त्यामुळेच आता खुद्द राज्यपालांना यात हस्तक्षेप करावा लागतो आहे. शिवसेना आणि भाजपनं राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली असून बुधवारी ते राज्यपालांची भेट घेणार आहेत.

close