मुख्यमंत्र्यांना स्वकियांकडूनच खिंडीत पकडण्याचे प्रयत्न -चव्हाण

May 21, 2015 9:08 AM0 commentsViews:

chavan--621x41421 मे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वकियांकडूनच खिंडीत पकडण्याचे प्रयत्न होत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. भाजपमधील अंतर्गत कलहामुळेच विकासकामांना खीळ बसत असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

मंत्र्यांमधील अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होत असल्यामुळे सरकारचं लोकांच्या कामांकडे लक्ष नाही असं जे चित्र आहे ते समाधानकारक अजिबात नाही असंही ते म्हणालेत. ‘नागरिक’ या सिनेमातील मुख्य कलाकार सचिन खेडेकर यांनी आयबीएन लोकमतचे पत्रकार बनून विचारलेल्या सडेतोड प्रश्नांना उत्तरं देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे मत व्यक्त केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close