इक्बाल मिरचीने दाऊदचे 4 फ्लॅट्स 1 हजार कोटींना विकले होते ?

May 21, 2015 9:28 AM0 commentsViews:

dawood ikbal mirchi21 मे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शोधाशोध एकीकडे सुरू आहे. पण, आता त्याच्या संपत्तीबाबत खळबळजनक माहिती समोर आलीये. दाऊद गँगचा म्होरक्या इक्बाल मिरचीनं मुंबईत 1 हजार कोटींचा जमीन व्यवहार केला होता. मुंबईतली ही मालमत्ता विकून युरोपमध्ये गुंतवणूक केली होती.

दाऊद इब्राहिमच्या संपत्तीच्या व्यवहाराची अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी सुरू केलीय. त्यातही एक्सक्लुझीव्ह माहिती आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली.

दाऊदचा एकेकाळचा सहकारी इक्बाल मिर्ची हा त्याचा मुंबईतला कारभार बघत होता. इक्बालचा लंडनमध्ये 2013 मध्ये मृत्यू झाला. इक्बालनं मुंबईतले सी फेसिंग असेलेले चार फ्लॅट्स एक हजार कोटींना विकले आणि तो पैसा दाऊदनं युरोपात रिअल इस्टेटमध्ये गुंतवला अशी माहिती आहे. त्याच बरोबर ब्रिटन, तुर्की, स्पेन, सायप्रस, दुबई आणि मोरक्को इथंही दाऊदनं गुंतवणूक केल्याची माहिती गुप्तचर सूत्रांना मिळलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close