वाचाळ ट्विटरदारांचा ओबामांना फटका

May 21, 2015 10:38 AM0 commentsViews:

obama twitter21 मे : ‘हॅलो, ट्विटर ! इट्स बराक रियली!’ असं ट्विट करून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विटरवर पदार्पण केलं खरं, पण इथंही त्यांना वर्णभेदाला सामोरं जावं लागतंय. बुधवारी 2 ट्विटरकरांनी ओबामांना हिणवलं. ओबामांना कर्करोग व्हावा, ओबामांना अमेरिकेतून हकलून द्यावं, अशा विकृत स्वरुपाचे ट्विट्स करण्यात आले.

ओबामांनी आपल्या या ट्विटर अकाऊंटद्वारे वर्णभेदासारख्या गंभीर विषयावर ट्विट केलंय. अमेरिकेनं वर्णभेदावर नियंत्रण मिळवण्यासाठी बराच लांबचा प्रवास केलाय. आणखी मोठा पल्ला अमेरिकेला अजून गाठायचाय असं ओबामांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

या ट्विटनंतर ओबामांच्या ट्विटर हँडलवर काही तिखट प्रतिक्रिया उमटल्यात. तर काहींनी त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केलीये. ट्विटरनं याची दखल घेऊन लगेच हे आक्षेपार्ह ट्विट्स काढून टाकले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close