वायूसेनेची धाडसी कामगिरी फत्ते, यमुना एक्स्प्रेस वेवर उतरवलं लढाऊ विमान !

May 21, 2015 11:16 AM0 commentsViews:

miraj 200021 मे : दिल्ली-आग्रा यमुना एक्स्प्रेसवेवर रोज गाड्या आणि ट्रक जात असतात, तिथे एक वायूदलाचं लढाऊ विमान उतरलं. वायूसेनेचं मिराज 2000 हे विमान यमुना एक्स्प्रेसवेवर उतरवलं गेलं. एखादं विमान रनवे सोडून दुसर्‍या ठिकाणी उतरण्याची ही देशातली पहिलीच वेळ आहे. यात थोडा धोका होता, पण वैमानिकांनी हे शक्य करून दाखवलं. जवळपास एक मिनिट हे विमान इथे होतं, आणि मग एक्स्प्रेस वे वरूनच विमानानं पुन्हा उड्डाण केलं.

आज (गुरुवारी) सकाळी सातच्या सुमाराला ही कवायत करण्यात आली. युद्धादरम्यान किंवा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत क्षमता तपासण्यासाठी वायूदलानं गी कसरत केली. गेले अनेक दिवस याची पूर्वतयारी सुरू होती. हे विमान ग्लाल्हेरच्या वायूदलाच्या बेसवरून निघालं, मथुरेजवळ एक्स्प्रेसवेवर हे विमान आधी 100 मीटर उंचीवर उतरवलं गेलं, आणि मग शेवटी ते रस्त्यावर सुरक्षितपणे उतरलं.  युद्ध सुरू असताना राष्ट्रीय महामार्ग विमान उतरवण्यासाठी वापरता येऊ शकतात का, याचा अभ्यास वायूदल करतंय. आजची कवायतही त्याचाच एक भाग होती.

वायूदलानं यासाठी काय तयारी केली होती ?

- तात्पुरतं एअर ट्रॅफिक कंट्रोल उभारण्यात आलं
- बचाव आणि शोधकार्यसाठी अधिकारी आणि वाहनं सज्ज ठेवली
- पक्षांना दूर ठेवण्यासाठीची यंत्रणा एक्स्प्रेसवेवर कार्यान्वित केली
- जिथे विमान उतरलं त्या पट्‌ट्यातून नागरी विमानं जाणार नाहीत याची खबरदारी
- स्थानिक नागरी आणि पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधलं

विमानतळ सोडून इतर ठिकाणी विमान उतरवण्यात कोणत्या समस्या येतात ?

- एअर ट्रॅफिक कंट्रोल नेहमीच जवळपास असेल याची खात्री नसते
- पक्ष्यांच्या खूप मोठा धोका असतो. छोटे ड्रोन्स आणि पतंग यांची समस्या असतेच.
- नागरी रस्त्यांचा दर्जा रनवेएवढा उत्कृष्ट नसतो. त्यावर खड्डे आहेत की नाही, याची शहानिशा करायला वेळ मिळेलच असं नाही

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close