मुस्लिम आहे म्हणून तरुणाला नाकारली नोकरी

May 21, 2015 1:23 PM0 commentsViews:

Zeeshan Ali Khan mumbai21 मे : आपण पुरोगामित्वाबद्दल कितीही बोललो, तरी जातीयवाद आपल्या समाजात किती खोलवर रुतलाय, याचं एक ताजं उदाहरण पाहण्यास मिळालं. मुंबईतला झेशान अली खान या तरुणाने हरेकृष्ण एक्सपोर्ट्स नावाच्या हीरे निर्यात करणार्‍या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. पण सॉरी, आम्ही फक्त बिगर मुस्लिम लोकांनाच नोकरीवर ठेवतो असं सांगून त्याला नकार देण्यात आला.

नोकरी तर मिळाली नाही पण त्याहुन धक्कादायक उत्तर ऐकून झेशान खान संताप व्यक्त केला. झेशाननं हा प्रकार फेसबूकवर टाकला आणि कंपनीवर खूप टीका होऊ लागली. कंपनीला संपर्क केल्यावर त्यांनी थातुरमातुर उत्तर दिलं. हे उत्तर एका नवख्या माणसानं पाठवलं, त्याचं प्रशिक्षणही अजून पूर्णही झालेलं नाही. आम्ही धर्माच्या आधारे भेदभाव करत नाही, असं या कंपनीतचं म्हणणं आहे. दरम्यान, या प्रकरणी हरेकृष्ण एक्सपोर्ट्स कंपनी एका कर्मचार्‍याला निलंबित केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close