कोल्हापुरात उद्या भाजपची राज्य परिषद

May 22, 2015 1:26 PM0 commentsViews:

bjp kohapur34322 मे : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी आणि राज्य परिषदेला उद्या(शनिवार)पासून कोल्हापुरात सुरुवात होतेय. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीत भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. आज भाजपच्या प्रदेश पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे. दोन ते तीन तास चालणार्‍या बैठकीत भाजपचे सर्व मंत्री उपस्थीत असतील. पण त्यापुर्वी आज कोल्हापूरमध्ये प्रदेश कार्यकारणीच्या पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close