बोपखेल गावात जमावबंदी, 400 गावकरी पोलिसांच्या ताब्यात

May 22, 2015 1:40 PM1 commentViews:

pimpri 34534522 मे : पिंपरी चिंचवडमध्ये बोपखेल गावात लष्कर आणि गावकर्‍यांमध्ये रस्त्याच्या वाद आणखी चिघळलाय. गुरुवारी पोलीस आणि गावकर्‍यांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. त्यामुळे आता गावात जमावबंदी लागू करण्यात आलीये. आतापर्यंत 200 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 74 महिला 80 पुरुष,13 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आलीये.

18 नागरिकांना एक दिवसांची पोलीस कोठडी तर 150 पुरुष आणि महिलांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलीये. पिंपरी चिंचवड शहरातील बोपखेल गावच्या ग्रामस्थांमध्ये गुरुवारी तुफान संघर्ष झाला. त्यावेळी ग्रामस्थांनी पोलीस आणि लष्करांवर दगडफेक केली होती.

तब्बल 185 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागरिकांवर बेकायदा जमाव जमवून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, सरकारी कामात अडथळा आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • योगेश बोरावके

    बोपखेल चे रहिवासी भारताचेच आहेत ना ! रस्त्याचा प्रश्न प्रशासनाला सामंजस्याने सोडविता का आला नाही ,अशा रस्याच्या प्रश्नावेळी आर्मीचे अधिकारी सामान्य नागरिकांना अतिशय तुच्छतेची वागणूक देत असतात जिल्हा प्रशासनाने मा.उच्च न्यायालयात बोपखेल गावकर्यांची बाजू निट मंडळी नाही त्यामुळे घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण ?

close