एअर इंडिया पायलटस्‌चा संपावर जाण्याचा इशारा

November 3, 2009 10:16 AM0 commentsViews: 4

3 नोव्हेंबर एअर इंडियाच्या अंदाजे 800 पायलट्सनी 24 नोव्हेंबरला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. बुधवारपर्यंत पायलट्सचा थकीत पगार आणि भत्ता दिला नाही तर संपावर जाण्याची धमकी एअर इंडिया पायलटस्‌च्या इंडियन कमर्शिअल पायलट्स युनियनने दिली आहे. या संघटनेत आठशे नॉन एक्झिक्यूटिव्ह पायलट्स आहेत. पायलट संघटनेनं कंपनीला यासंदर्भात एक नोटीस पाठवून दहा नोव्हेंबरपर्यंत पायलटस्‌चे थकीत पगार देण्याची विनंती केली आहे. दरम्यान याच मुद्यावर सप्टेंबरमध्ये अंदाजे 400 पायलट्स 4 दिवसाच्या सुट्टीवर गेले होते. पायलटस्‌नी अचानक सुट्टीवर घेतल्यामुळे 200 फ्लाईट्स रद्द करावे लागले होते. त्यामुळे कंपनीला अंदाजे 10 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं होतं.

close