मुंबईचं महत्त्व कमी करू नका,सेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

May 22, 2015 5:52 PM0 commentsViews:

desai22 मे : केंद्रीय मुख्यालयं हलवण्यावरून भाजप शिवसेनेत पुन्हा वाद पेटण्याची चिन्ह आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं महत्त्व कमी करू नका, एअर इंडियाचं मुख्यालय परत मुंबईत आणा अशी मागणी सेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलीये.

मुंबईतली केंद्रीय मुख्यालयं हलवायला शिवसेनेनं विरोध केला आहे. सुभाष देसाई यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारला होता. आता देसाईंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुख्यालयं मुंबईला परत देण्याचं आवाहन केलंय.

सुभाष देसाई यांनी पत्रात काय म्हटलंय ?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं महत्त्व कमी करू नका
एअर इंडियाचं मुख्यालय परत मुंबईत आणा
मुंबईतल्या अँटोप हिलचं पेटेन्ट, डिझाईन आणि ट्रेडमार्क्स, महानियंत्रकाचं मुख्यालय नवी दिल्लीत हलवू नका.
पालघरची मरीन पोलीस ऍकॅडमी द्वारकाला जाऊ देऊ नका.
मुंबई गोदीतला जुनी जहाजं तोडण्याचा दारुखाना कारखाना गुजरातमध्ये अलंगला जातोय. तो जाऊ देऊ नका.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close