कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

May 22, 2015 7:22 PM0 commentsViews:

cm tafa kolhapur322 मे : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापुरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. भाजपच्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये दाखल झाले.

त्यावेळी टेंभलाई वाडीजवळ कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी तातडीने धाव घेत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पानसरे यांच्या हत्येला 3 महिने पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही मारेकरी मोकाट आहे. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close