सोन्याच्या भावाचा उच्चांक

November 3, 2009 12:41 PM0 commentsViews: 4

3 नोव्हेंबर मंगळवारी सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला. मार्केटमध्ये सोन्याचा भाव दहा ग्रॅमला 16 हजार 250 रुपयांवर पोचला आहे. सोनं इतकं महागलं असूनही सोन्याच्या खरेदीत मात्र भारतीय मागे नाहीत. दिवाळीच्या काळामध्ये देशात एकूण 56 टन सोनं विकलं गेलं होतं. त्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीकडे कमी न होणारा कल पाहता, सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात अशाप्रकारे सोन्याचे दर महागले असताना ज्वेलर्स आणि व्यापार्‍यांना मात्र याचा चांगलाच फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर कमजोर पडल्यामुळे मोठ्या ट्रेडर्स आणि इनव्हेस्टर्सकडून सोन्यातली गुंतवणूक वाढत आहे. याचाही सोन्याच्या दरांवर परिणाम दिसला.

close