‘भाजप’नीती, टार्गेट अजित पवार पण अंकुश राष्ट्रवादीवर !

May 22, 2015 7:57 PM0 commentsViews:

आशिष जाधव,मुंबई

22 मे : बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अँटी करप्शन ब्युरोकडून समन्स बजावण्यात आलंय. तर राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात अजित पवारांची चौकशी होतेय. त्यामुळं अजित पवारांनाच टार्गेट करुन भाजप सरकार राष्ट्रवादीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

fadanvis target ajit pawar33आदर्श घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बनलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीला लक्ष्य करताना राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं. आणि बँकेतल्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू झाली. बँकेच्या 1600 कोटी रुपयांचा हिशेब लागत नसल्याचं चौकशीत उघड झाल्यामुळं बँकेचे एकमेव तत्कालीन मंत्री संचालक असलेल्या अजित पवारांना प्रत्यक्ष चौकशीला सामोरं जावं लागतंय.

आधी सिंचन घोटाळ्याच्या बातम्या मग श्वेतपत्रिका,नंतर चितळे समितीची चौकशी आणि आता अँटी करप्शन ब्युरोची फौजदारी चौकशी या चौकशीअंतर्गत अजित पवारांवर समन्स बजावण्यात आलाय. त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते सैरभैर झालेले आहेत.

खुद्द अजित पवारांच्याच चौकशीमुळे राष्ट्रवादी आणि भाजपमधले संबंध ताणले गेले आहेत. त्यातच सिंचन घोटाळ्याची चौकशी कुठल्याही परिस्थितीत पूर्णत्वास नेली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय.

एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं सेना-भाजप युती तुटेल आणि भाजप सत्तेसाठी राष्ट्रवादीची मदत घेईल, अशी शक्यता कायम वर्तवली जाते. त्यामुळंच भाजप सरकारनं राष्ट्रवादीवर अंकुश ठेवण्यासाठी अजित पवारांचीच कोंडी करायचं ठरवलं नाही ना अशीही चर्चा सुरू झालीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close