पोलिसांना देण्यात येतंय जादूटोणा विरोधी कायद्याचं प्रशिक्षण

May 23, 2015 1:45 PM0 commentsViews:

police train black magice23 मे : जादूटोणा विरोधी कायदा येऊन अनेक दिवस झाले असले तरीही पोलिसांना हा कायदा नेमका कसा राबवावा याची नीट माहिती नसल्यामुळे तपासात अनेक तृटी राहतायत. यावर उपाय म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितिचे अध्यक्ष शाम मानव यांच्याकडून राज्यातल्या सर्व जिल्ह्यातील पोलीस दलाला हा कायदा राबवण्याचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.

श्याम मानव यांच्याकडून अशा प्रकारचं पोलीस प्रशिक्षण सुरू असून यात कायद्याच्या माहितीसोबतच पोलिसांची परीक्षाही घेण्यात येतेय. कायदा समजण्यासाठी मुळात अंधश्रद्धा म्हणजे काय ?, हे समजावण्यासाठी शाम मानव पोलिसांसमोर वेगवेगळे जादूटोण्याचे प्रयोग आणि त्यामागचं विज्ञानही उलगडून दाखवतायत. कोकणातल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या तिंन्ही जिल्ह्यात अशा प्रकारची पोलीस प्रशिक्षण घेण्यात आली. याचा आपल्याला फायदाच होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. तसंच केवळ पोलिसांनाच नव्हे तर न्यायव्यवस्थेत समाविष्ट असणार्‍या सर्वांनाच अशा प्रशिक्षणाची गरज असल्याचं काही पोलीस अधिकार्‍यांनी म्हटलंय. सर्वसामान्य नागरिकांना भोंदूबाबा वेगवेगळे चमत्कार दाखवून भुलवत असतात. खरंतर या चमत्कारांमागे विज्ञान असतं हेच वेगवेगळ्या उदाहरणातून दाखवण्याचा शाम मानव यांचा प्रयत्न आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close